---Advertisement---

आपले मत, आपला निर्णय; शेगांव नगरपरिषद मतदानाला उत्साही सुरुवात!

---Advertisement---

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगांव नगरपरिषद निवडणूक 2025 साठी आज सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरू झाली. शहरातील सर्व मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांची उपस्थिती दिसू लागली असून, नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. प्रशासन, पोलिस विभाग आणि निवडणूक अधिकारी यांनी सर्व तयारी पूर्ण करून मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी कडक बंदोबस्त ठेवला आहे.

मतदान हा प्रत्येक नागरिकाचा लोकशाहीतील किमती हक्क असून, आपल्या एका मतामुळे शहराच्या विकासाचा मार्ग आखला जातो. त्यामुळे आज शेगावकरांनी घराबाहेर पडून आपल्या हक्काचा आणि कर्तव्याचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, काही केंद्रांवर वरिष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र रांगा, पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि सावलीची व्यवस्था करण्यात आली आहे. तरुण मतदार देखील मोठ्या संख्येने पुढे येत असल्याचे चित्र दिसत आहे.

लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे मत मोलाचे आहे. शहराच्या विकासासाठी योग्य नेतृत्वाची निवड करण्यासाठी शेगांवकरांनी मतदानाचा हक्क बजावून सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे.

शांतता, सुव्यवस्था आणि पारदर्शकता यांना प्राधान्य देत शेगांवमध्ये मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू आहे. आजचा दिवस शेच्या भविष्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment