---Advertisement---

शिवसेनेत मोठा प्रवेश : माजी नगरसेवक उमेश अग्रवाल व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्र्यंबक भराड शिवसेनेत दाखल

“आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली उमेश अग्रवाल व त्र्यंबक भराड यांचा शिवसेनेत प्रवेश”
---Advertisement---

बुलढाणा (आकाश बोरसे) : बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार तथा शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख धर्मवीर आमदार संजय गायकवाड यांच्या प्रभावी नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक उमेश अग्रवाल तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी त्र्यंबक भराड यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

हा पक्षप्रवेश सोहळा शुक्रवार, दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी आमदार संजय गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना मातोश्री जनसंपर्क कार्यालय, बुलढाणा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेनेची ध्येयधोरणे, सर्वसामान्य जनतेसाठी राबविण्यात येणारी विकासाभिमुख कामे तसेच आमदार संजय गायकवाड यांचे ठोस व प्रभावी नेतृत्व यामुळे आपण शिवसेनेची वाट निवडल्याचे उमेश अग्रवाल यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे त्र्यंबक भराड यांनीही शिवसेना हीच जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारी खरी लोकाभिमुख चळवळ असल्याचे सांगितले.

या दोन्ही नेत्यांच्या प्रवेशामुळे बुलढाणा शहर व जिल्ह्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment