---Advertisement---

आज होणार स्व. अजितदादा पवार यांचे “पवित्र अस्थीकलश दर्शन” | शेगाव

Asthi Kalash Darshan Ajit Pawar
---Advertisement---

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि जनतेच्या मनात विशेष स्थान असलेले लोकनेते स्व. अजितदादा पवार यांचे पवित्र अस्थी कलश दर्शन आज मंगळवार, 3 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आले आहे.

हा श्रद्धांजलीपर कार्यक्रम आज सायंकाळी ठीक 5.00 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, शेगाव (जि. बुलढाणा) येथे संपन्न होणार आहे.

आज होणाऱ्या या कार्यक्रमासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार तसेच सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

स्व. अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात व सामाजिक जीवनात दिलेले योगदान अविस्मरणीय असून, आज होणारा अस्थी कलश दर्शनाचा हा कार्यक्रम त्यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करण्याचा भावनिक क्षण ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment