---Advertisement---

अर्जुन ढगे यांची जिल्हा सहसचिव पदी नियुक्ती; संग्रामपूर तालुका ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेच्या वतीने भव्य सत्कार

अर्जुन ढगे यांचा जिल्हा सहसचिव पदी निवडीबद्दल सत्कार
---Advertisement---

संग्रामपूर (आकाश बोरसे) : बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ आज दि. 3 फेब्रुवारी 2026 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, पंचायत समिती संग्रामपूर येथे उत्साहात पार पडला.

या समारंभात बुलढाणा जिल्हा रोजगार सहाय्यक संघटनेच्या सहसचिव पदी अर्जुन ढगे यांची नियुक्ती झाल्याबद्दल संग्रामपूर तालुका रोजगार सहाय्यक संघटनेच्या वतीने त्यांचा शाल-श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.

जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांचाही सत्कार

  • श्रीमंत देशमुख – जिल्हाध्यक्ष
  • पृथ्वीराज गवई – जिल्हा सचिव
  • मदनजी खरात – माजी जिल्हाध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक
  • संजय मोरे – संघटक
  • सुनील पहुरकर – सहसचिव
  • ज्योतीराम इंगळे – विधी सल्लागार
  • भगवान अवसरमोल, योगेश चिंचोले, शांतीलाल डोंगरे, गजानन लोखंडे

सर्वांचा संग्रामपूर तालुका रोजगार सहाय्यक संघटनेच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाची रूपरेषा

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देविदासजी शिंदे होते.
प्रमुख उपस्थितीत जिल्हाध्यक्ष श्रीमंत देशमुख, जिल्हा सचिव पृथ्वीराज गवई, राज्य सहसचिव व जिल्हा प्रसिद्धी मार्गदर्शक तसेच जिल्हा कार्यकारिणीतील सर्व सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

  • सूत्रसंचालन – अर्जुनजी ढगे
  • प्रास्ताविक – राहुलभाऊ मेटांगे
  • आभार प्रदर्शन – संतोषजी वानखडे

तालुका पदाधिकाऱ्यांची लक्षणीय उपस्थिती

यावेळी संग्रामपूर तालुक्यातील तालुकाध्यक्ष राहुलभाऊ मेटांगे, उपाध्यक्ष सुरजभाऊ परघरमोर, सचिव गजानन भाऊ बामणे, तसेच शेषराव वानखडे, देविदास मेहंगे, किशोर म्हसाळ, अक्षय गायगोळ, गौतम इंगळे, रोशन भोजने, विनोद मोरे, रवी मावसकर, विलास गवांदे, सुरेश कुरवाडे, पांडुरंग खारोडे, ज्ञानेश्वर आगरकर, गणेश मोरखडे, बाळकृष्ण बोदडे, नारायण वानखडे, भागवत भिसे यांच्यासह संग्रामपूर तालुक्यातील सर्व रोजगार सहाय्यक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment