---Advertisement---

शेगावमध्ये भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन; ४ फेब्रुवारीला सकल हिंदू समाजाचा एकजुटीचा निर्धार

हिंदू सम्मेलन शेगांव
---Advertisement---

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : हिंदू समाजात जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सकल हिंदू समाज, शेगाव यांच्या वतीने भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सनातन धर्म, सनातन संस्कृती आणि सामाजिक एकतेचे बळकटीकरण या उद्देशाने हे संमेलन महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

हे हिंदू संमेलन बुधवार, दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता शेगाव शहरातील १०८ दिगंबर जैन मंदिर समोर, जिजामाता नगर येथे पार पडणार आहे. या संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत :

  • मा. स्वप्निलजी राऊत (बुलढाणा विभाग प्रचारक),
  • सौ. अंजलीताई मुरलीधर अहीर (सेवानिवृत्त शिक्षिका, शेगाव)
  • ह. भ. प. श्री. गोपाळ महाराज राहाणे (श्री संत लक्ष्मणगिरी महाराज संस्थान, मांडका)

तसेच श्री संत गजानन महाराज वस्ती, शेगाव येथील उपस्थिती कार्यक्रमाला लाभणार आहे.

हिंदू समाजाला नवचैतन्य देणे, धर्मसंस्कारांची जपणूक करणे आणि समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे हा या हिंदू संमेलनाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे शेगावसह परिसरातील सर्व हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सकल हिंदू समाज, शेगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment