---Advertisement---

अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान; पंचनामे करून तात्काळ मदत देण्याची मागणी

Shivsena Kisan Cell
---Advertisement---

शिवसेना किसान सेनेचे तहसीलदारांना निवेदन

संग्रामपूर (आकाश बोरसे) : तालुक्यात दि. २७ जानेवारी रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे गहू, मका, हरभरा, संत्रा, कांदा तसेच इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना किसान सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात दि. ३ फेब्रुवारी रोजी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या संग्रामपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. महसूल विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील अंदाजे २४ गावे बाधित असून १५८६.७ हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका बसला आहे.

बाधित गावे: धामणगाव, वसाळी, हडीयामहल, तामगाव, सावळा, मारोड, सायखेड, अकोली बु., अकोली खु., राजपूर, मालठाणा बु., मालठाणा खु., गोपाळखेड, झाशी, निमखेड, पळशी, करमोडा, शिवणी, लोहगाव बु., लोहगाव खु., शेवगा खु., शेवगा बु., लाडणापूर भाग–१, चिचारी.

निवेदनावर शिवसेना किसान सेनेचे उपजिल्हाप्रमुख अमोल पाटील ठाकरे यांच्यासह कैलास कडाळे (विधानसभा संघटक), मोहन ठाकरे (किसान सेना ता. प्रमुख), ज्ञानेश्वर गोतमारे, संजय खोंड, सुनील मुकुंद, जितेंद्र तायडे, नंदू पाटील खानजोड, सैय्यद रेहान सैय्यद भिकन, रवींद्र घोडसे, गजानन गोतमारे, विनायक गोतमारे, गणेश डाखोडे आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
तात्काळ मदत न मिळाल्यास आंदोलनाचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment