---Advertisement---

जळगाव जामोदमध्ये 4 BLO अधिकाऱ्यांचा गौरव; 13 दिवसांत 100% काम पूर्ण!!

---Advertisement---

जळगाव जामोद | (आकाश बोरसे) : भारत निवडणूक आयोगाच्या ‘विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-2026’ अंतर्गत जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील चार मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी विक्रमी वेगाने काम पूर्ण करून आदर्श निर्माण केला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल 13 जुलै 2026 रोजी उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी शैलेश काळे यांच्या हस्ते त्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेत BLO हे आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक कुटुंबाला भेट देऊन मतदार पडताळणी, माहिती संकलन आणि आवश्यक नमुने भरून घेण्याचे काम करत आहेत. या मोहिमेसाठी 30 जून ते 29 जुलै 2026 ही मुदत देण्यात आली होती.

मात्र, निर्धारित मुदतीपूर्वीच केवळ 13 दिवसांत 100 टक्के इन्युमरेशन फॉर्म्सचे डिजिटायझेशन पूर्ण करणाऱ्या चार अधिकाऱ्यांचा विशेष गौरव करण्यात आला.

सत्कार झालेले BLO अधिकारी

  • सुनीता विजय मोरे – अंगणवाडी सेविका, यादी भाग क्र. 222, कळमखेड
  • सपना दिनेश ससाणे – आशा वर्कर, यादी भाग क्र. 211, आडोळ बु.
  • सुनीता परमेश्वर वानखडे – अंगणवाडी सेविका, यादी भाग क्र. 126, वडगाव पाटन
  • वैभव ज्ञानेश्वर चव्हाण – सहायक शिक्षक, यादी भाग क्र. 5, भिंगारा

यावेळी शैलेश काळे यांनी या चार अधिकाऱ्यांचे अभिनंदन करत इतर BLO यांनीही त्यांचा आदर्श घेऊन आपले काम वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले. तसेच नागरिकांनीही आवश्यक माहिती अचूकपणे उपलब्ध करून देत या मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाला तहसीलदार पवन पाटील, नायब तहसीलदार भरत किटे, सत्यविजय सातव तसेच निवडणूक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment