---Advertisement---

Buldhana Rain News: Sangrampur-Jalgaon Jamod; मध्ये पावसाचा हाहाकार; हजारो हेक्टर पिके पाण्याखाली, NH-161G ठप्प!

---Advertisement---

बुलढाणा |(आकाश बोरसे) : दि. 21 जुलै-बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सातपुडा पर्वतरांगांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्या, नाले आणि ओढे दुथडी भरून वाहत असून अनेक गावांमध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

चांगेफळ, निवाणा, रूधाणा, आकोली तसेच परिसरातील अनेक गावांतील शेकडो ते हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. केळी, सोयाबीन, कापूस (पराटी), उडीद, मूग आणि संत्रा या प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग 161G वरील अनेक पुलांवर पुराचे पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. प्रशासनाने नागरिकांना विनाकारण प्रवास टाळण्याचे आवाहन केले असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.

शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

मुख्य मुद्दे

  • मुसळधार पावसामुळे संग्रामपूर व जळगाव जामोदमध्ये पूरस्थिती
  • हजारो हेक्टर शेती पाण्याखाली
  • केळी, सोयाबीन, कापूस, उडीद, मूग व संत्रा पिकांचे मोठे नुकसान
  • राष्ट्रीय महामार्ग 161G वरील वाहतूक ठप्प
  • शेतकऱ्यांकडून तातडीच्या पंचनाम्याची व मदतीची मागणी (युवा क्रांती वृत्तसेवा)

पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा👇🏻

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment