---Advertisement---

आनंद सागर पार्किंगमधून दुचाकी चोरी; शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!!

---Advertisement---

शेगाव |(युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव येथील आनंद सागर पार्किंग परिसरातून स्प्लेंडर प्लस मोटारसायकल चोरी झाल्याची घटना समोर आली असून शेगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोपान रमेशराव वसु (वय ३४, व्यवसाय शेती, रा. तुरखेड ता. अंजनगाव सुर्जी जि. अमरावती) हे आपल्या पत्नी व मुलासह श्री गजानन महाराज मंदिर येथे दर्शनासाठी आले होते. दर्शनानंतर दि. ७ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे १:३० वाजता ते आनंद सागर येथे फिरण्यासाठी गेले.

यावेळी त्यांनी आपली स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्रमांक MH 30 X 7290 ही आनंद सागर समोरील पार्किंगमध्ये हँडल लॉक करून उभी केली होती. त्यानंतर दुपारी ४ वाजताच्या सुमारास परत आल्यानंतर मोटारसायकल जागेवर दिसून आली नाही. परिसरात शोध घेऊनही वाहन मिळून न आल्याने अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार देण्यात आली.

चोरीस गेलेली मोटारसायकल जुनी वापरती असून तिची अंदाजे किंमत १५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

या प्रकरणी शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये कलम 303(2) भा.न्या.सं. 2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कर्मचारी रवी इंगळे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment