जलंब, ता. शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्याअंतर्गत भाजपा महिला मोर्चा शेगाव ग्रामीणच्या वतीने जलंब येथील श्रीराम मंदिरात ‘आशीर्वाद का दिया’ आणि महाआरती कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी राम मंदिरात १०८ दिवे प्रज्वलित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.
कार्यक्रमात भाजपा महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा रूपाली बरडे, तालुका उपाध्यक्षा मालुताई देशमुख, जिल्हा सोशल मीडिया संयोजिका चेतना खेते, जिल्हा सचिव अर्चना बाठे, सुनीता मिरगे, सुमन डवले, देशमुख यांच्यासह महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या. तालुका उपाध्यक्षा मालुताई देशमुख यांच्या हस्ते श्रीरामाची महाआरती करण्यात आली.
यावेळी चेतना खेते यांनी महिलांसाठी राबविण्यात आलेल्या विविध योजनांचा उल्लेख करत महिलांच्या सक्षमीकरणाबाबत भूमिका मांडली. मालुताई देशमुख यांनी उज्ज्वला गॅस आणि बचत गटांसह विविध उपक्रमांमुळे महिलांना आत्मविश्वास मिळाल्याचे सांगितले.

राजेंद्र ढोले यांनी महिला मोर्चाच्या उपक्रमाचे कौतुक करत पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये महिला मोर्चाचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले. सोनटक्के गुरुजी यांनी दिवा हा अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरविण्याचे प्रतीक असल्याचे सांगितले.
माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भाऊ सावरकर यांनी शेतकरी सन्मान योजना, गरीब कल्याण योजना तसेच ग्रामीण भागातील विकासकामांचा उल्लेख केला. जलंबसारख्या गावातून महिलांनी प्रज्वलित केलेले १०८ दिवे आणि दिलेला आशीर्वाद हा विशेष असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष महादेव मिरगे, कार्यक्रम संयोजक शशिकांत भेंडे, युवा मोर्चा अध्यक्ष सागर बोळे, उत्तम घोपे, मनीष सडतकार, श्रीकृष्ण भागवत, पंकज मुंडवाले, नंदू भाऊ चौधरी, बाळुभाऊ सोनटक्के यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपा महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा रूपाली बरडे यांनी केले, तर आभार जिल्हा उपाध्यक्ष महादेव मिरगे यांनी मानले.









