---Advertisement---

संग्रामपूर तालुक्यातील महिलांना ‘लाडक्या बहिणी’ योजनेचा लाभ द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा!!

---Advertisement---

पिंप्री काथरगाव (आकाश बोरसे) : संग्रामपूर तालुक्यातील पिंप्री काथरगाव येथील दि. 20 मे ला गट ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त आदर्श सरपंच सौ. सुवर्णाताई गणेश टापरे यांनी संग्रामपूर तालुका महिला व बाल विकास अधिकारी यांना निवेदन सादर करून ‘लाडक्या बहिणी’ योजनेअंतर्गत मार्च व एप्रिल महिन्याचे प्रलंबित पैसे तात्काळ देण्याची मागणी केली आहे.

निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, तालुक्यातील काही महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे मिळाले असले तरी अद्यापही सुमारे 50 टक्के महिलांना योजनेचा लाभ मिळालेला नाही. याबाबत संबंधित कार्यालयाशी संपर्क साधला असता समाधानकारक उत्तरे न देता उडवाउडवीची भूमिका घेतली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

यामुळे लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, उर्वरित महिलांना तात्काळ दोन महिन्यांचे पैसे देण्यात यावेत, अशी मागणी सरपंच सौ. सुवर्णाताई टापरे यांनी केली आहे.

तसेच, प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष न दिल्यास संग्रामपूर तालुक्यातील महिलांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment