---Advertisement---

राज्यातील सर्व रुग्णालयांचे Fire आणि Electrical Safety Audit; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचे तातडीच्या कारवाईचे निर्देश!

---Advertisement---

मुंबई, (युवा क्रांती वृत्तसेवा) : दि. २५ ऑगस्ट – राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व शासकीय, खासगी आणि धर्मादाय रुग्णालयांमध्ये Fire Audit, Electrical Safety आणि Building Safety Audit करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत.

रुग्णालयांमधील अग्निसुरक्षा उपाययोजना, विद्युत व्यवस्था, इमारतीची स्थिती तसेच संबंधित यंत्रणांचे ऑडिट करून त्याचा अहवाल शासनाला सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ऑडिटमध्ये आढळणाऱ्या त्रुटी तातडीने दूर करण्यावर भर देण्यात आला आहे.

ICU, NICU आणि OT ची विशेष तपासणी

रुग्णालयातील ICU, NICU, Nursery आणि Operation Theatre (OT) यांसारख्या संवेदनशील विभागांमधील अग्निसुरक्षा व्यवस्थेचा विशेष आढावा घेतला जाणार आहे. यासोबतच विद्युत सुरक्षा, मेडिकल गॅस पाइपलाइन, आपत्कालीन स्थलांतरण व्यवस्था, अग्निशमन उपकरणे, कर्मचारी प्रशिक्षण आणि Mock Drill यांचीही तपासणी केली जाणार आहे.

प्रत्येक इमारत व ब्लॉकची सहा महिन्यांत तपासणी

रुग्णालयाच्या आवारातील प्रत्येक इमारत आणि ब्लॉकचा सहा महिन्यांच्या चक्रात अग्निसुरक्षा मूल्यांकनात समावेश केला जाणार आहे. केवळ कागदोपत्री Fire Audit न करता प्रत्यक्ष परिस्थितीची तपासणी करून आवश्यक सुधारणा करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

प्रत्येक आरोग्य संस्थेत Nodal Officer

प्रत्येक आरोग्य संस्थेत अग्निसुरक्षेसाठी Nodal Officer नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हे अधिकारी Fire Audit, Electrical Safety, अग्निशमन यंत्रणा, Emergency Evacuation, कर्मचारी प्रशिक्षण आणि Mock Drill यांचा नियमित आढावा घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल सादर करतील.

त्रुटींमुळे घटना घडल्यास संस्थाप्रमुखांची जबाबदारी

Fire Audit मध्ये दिरंगाई किंवा सुरक्षा उपाययोजनांमधील गंभीर त्रुटींमुळे अनुचित घटना घडल्यास संबंधित संस्थाप्रमुखांची जबाबदारी निश्चित केली जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

अग्निसुरक्षा मूल्यांकन आणि त्यानंतर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल नियमितपणे शासनाला सादर करण्याचे निर्देशही आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment