शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा ) : शहरातील गणेश नगर परिसरात एका महिलेला तिच्याच नातेवाईकांकडून विनाकारण शिवीगाळ करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना १४ एप्रिल रोजी रात्री सुमारे ९.३० वाजता घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. प्रज्ञा मंगेश माळी या रात्री दुकानात जात असताना आरोपी दुर्गा महादेव माळी व महादेव भास्कर माळी यांनी जुन्या वादाच्या कारणावरून त्यांना अडवून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
फिर्यादीने विरोध करत “विनाकारण शिवीगाळ का करता?” असा जाब विचारल असता, आरोपी संतप्त झाले. तसेच हातातील दगड फिर्यादीच्या डोक्यात मारून गंभीर दुखापत केल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेनंतर जखमी महिलेनं शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२(३)(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
👮♂️ या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेंद्रसिंग चव्हाण करीत आहेत.









