---Advertisement---

वकाना ग्रामपंचायत कार्यालयात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी!!

---Advertisement---

वकाना,(आकाश बोरसे) : दि.३१मे -वकाना, ता. संग्रामपूर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कार्यालय, वकाना येथे अभिवादन व स्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले.

कार्यक्रमाला मल्हार सेना संग्रामपूर तालुका अध्यक्ष योगेश बाजोड, संग्रामपूर तालुका काँग्रेस कमिटी महिला अध्यक्ष वैशालीताई खिरोडकर, कृषी उत्पन्न बाजार समिती संग्रामपूरच्या माजी उपसभापती शीलाताई खिरोडकर, सामाजिक कार्यकर्ते संतोषभाऊ बाजोड, गजाननभाऊ खिरोडकर, मोहन पुंडे, राहुल बाजोड, सतीश करांगळे, ग्रामपंचायत सदस्य राहुल गव्हांदे, विनायक निमकर्डे, अनंता इंगळे, सोपान वेरुळकर यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी श्रीराम निमकर्डेविलास गव्हांदे उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा आदर्श समाजाने घ्यावा, असे मत व्यक्त केले. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment