---Advertisement---

संग्रामपूर तालुक्यात मुसळधार पाऊस; नद्यांना पूर, शेतकरी व घरांचे मोठे नुकसान, तातडीच्या मदतीची मागणी!!

---Advertisement---

संग्रामपूर | (आकाश बोरसे) : हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार बुलढाणा, अकोला आणि अमरावती जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार 8 जुलै 2026 रोजी सकाळपासूनच बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात, सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी जोरदार पाऊस झाला.

सततच्या पावसामुळे केदार नदीसह अनेक लहान-मोठ्या नद्या व नाल्यांना पूर आला आहे. वरवट, संग्रामपूर, निवाना, चांगेफळ आदी गावांतील नदीपात्र दुथडी भरून वाहत असून काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.

तालुक्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून काही शेतकऱ्यांच्या घरांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. सततच्या पावसामुळे अनेक कुटुंबांवर संकट ओढवले आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तात्काळ नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करावेत आणि बाधित शेतकरी व नागरिकांना शासनाच्या नियमांनुसार त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नागरिक व शेतकरी करत आहेत. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment