---Advertisement---

दुर्गम १२ गावांना १२ हजार लिटर केरोसीन मंजूर; संग्रामपूर तहसीलदारांचा आदेश!!

---Advertisement---

संग्रामपूर (आकाश बोरसे) : 28 मे-संग्रामपूर तालुक्यातील दुर्गम तसेच मुख्य ठिकाणापासून दूर असलेल्या १२ गावांसाठी शासनाकडून १२ हजार लिटर केरोसीन मंजूर करण्यात आले आहे. प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला ३ लिटर केरोसीन वितरित करण्यात येणार असून यासंदर्भातील आदेश तहसीलदार प्रशांत पाटील यांनी जारी केले आहेत.

सदर केरोसीनचा साठा उपलब्ध झाला असून परवानाधारक रास्तभाव दुकानदार व केरोसीन डीलरमार्फत गावनिहाय वितरण करण्यात येणार आहे. तालुक्यातील के. एस. कोकाटे (रोहिणखेडी, सालवन), एन. टी. जैस्वाल (पिंगळी बु.), एफ. एस. मुरते (सायखेड, आलेवाडी), एन. बी. भाटिया (विचारी), जे. एस. पालकर (बसातळी, हडिया महाल), पी. बी. जैस्वाल (करमोडा), जे. ए. जैस्वाल (लाहमापूर) तसेच चैतन्य महिला बचत गट (शिवणी) यांचा वितरणामध्ये समावेश आहे.

सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र व राज्य शासनाने सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत तात्पुरत्या स्वरूपात केरोसीन वाटपाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अंत्योदय व प्राधान्य शिधापत्रिकाधारकांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. साठा उपलब्ध असल्यास श्वेत शिधापत्रिका धारक, शिधापत्रिका नसलेली कुटुंबे व स्थलांतरित नागरिकांनाही (ग्रामपंचायत रहिवासी दाखला आवश्यक) केरोसीन मिळणार आहे.

प्रति लिटर ६५ रुपये दराने केरोसीन विक्री करण्यात येणार असून अधिक दराने विक्री केल्यास कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे. केरोसीनचा वापर केवळ घरगुती कारणांसाठीच करावा, पेट्रोल-डिझेलमध्ये भेसळ किंवा औद्योगिक वापर आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment