---Advertisement---

राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धा शेगांव येथे उत्साहात संपन्न; शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग!!

---Advertisement---

शेगांव | (डी ललित) : शेगांव येथे १२ एप्रिल रोजी Success Path Education Pvt. Ltd. या संस्थेमार्फत भव्य राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून शेकडो विद्यार्थी आणि अबॅकस शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन संस्थेचे संचालक रणजीत रावसाहेब देशमुख आणि सौ. दर्शना रणजीत देशमुख यांनी केले होते.

🎓 मान्यवरांची उपस्थिती व मार्गदर्शन

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून

  • डॉ. एस. एस. म्हस्के (HOD, E&TC विभाग, माऊली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग)
  • प्रा. प्रतीक देशमुख (HOD, सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस, शेगांव)

हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा दिली.

🏆 पुरस्कारांचा वर्षाव

स्पर्धेमध्ये विविध गटांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना सन्मानित करण्यात आले:

  • 🥇 बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड:
    आविष्कार अबॅकस अकॅडमी (अंत्री देशमुख)
    इंग्लिश गुरु अकॅडमी (वडेगाव)
  • 🥈 बेस्ट फ्रँचायझी अवॉर्ड:
    वैषाली अरू (रिठाड)
    शीतल पाटील (भुसावळ)
  • 🥉 ऍक्टिव्ह सेंटर अवॉर्ड:
    राहुल राऊत (मेहकर)
    तेजस्विनी चव्हाण देशमुख (शेगाव)

🚴 विशेष आकर्षण: सायकल बक्षीस

स्पर्धेत १०० पैकी १०० गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना “चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स” हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. याशिवाय, अत्यंत कमी वेळेत पूर्ण गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षक सायकल बक्षीस देण्यात आले. यावेळी तीन विद्यार्थ्यांना सायकली देऊन गौरविण्यात आले.

📊 विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासाला चालना

या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या गणिती आणि तार्किक कौशल्यांचा विकास होण्यास मोठी मदत झाली आहे. भविष्यात अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल, असे मत सौ. दर्शना देशमुख यांनी व्यक्त केले. तसेच पालकांनी विद्यार्थ्यांना अशा अभ्यासक्रमात सहभागी करून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment