---Advertisement---

Shegaon Crime: मुरारका शाळेसमोरील भुतबंगला परिसरातून ऑटो चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल!!

---Advertisement---

शेगाव, (डी ललित) : दि. 29 जुलै – शेगाव शहरातील मुरारका शाळेसमोरील भुतबंगला परिसरातून एक ऑटो रिक्षा चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रीकृष्ण भिमराव लासुरकर (वय 44), व्यवसाय ऑटो चालक, रा. मुरारका शाळेसमोर, भुतबंगला, शेगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. 28 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 11 वाजताच्या दरम्यान त्यांचा एमएच 28 टी 3881 क्रमांकाचा पियाजिओ एपी डिझेल थ्री-व्हीलर ऑटो (अंदाजे किंमत ₹40 हजार) अज्ञात चोरट्याने चोरून नेला.

या प्रकरणी दि. 29 जुलै 2026 रोजी दुपारी 12.23 वाजता शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष गवई करीत आहेत. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment