---Advertisement---

शेगावात बांधकामादरम्यान उंचावरून पडून कामगाराचा मृत्यू; पोलिसांत मर्ग दाखल!!

---Advertisement---

शेगाव, (डी ललित) : दि. 18 जुलै – शेगाव शहरातील जमजम नगर परिसरात बांधकामाचे काम करत असताना उंचावरून पडल्याने 27 वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची (मर्ग) नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख समीर शेख चांद (वय 27, रा. मज्जिदजवळ, मेहबूब नगर, खामगाव) हा 18 जुलै रोजी सायंकाळी जमजम नगर परिसरात बांधकामाचे काम करत असताना उंचावरून खाली पडला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला.

जखमी अवस्थेत त्याला तातडीने सईबाई मोटे सामान्य रुग्णालय, शेगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या लेखी मेमोच्या आधारे शेगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम 194 अंतर्गत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या प्रकरणाची नोंद पोलीस हेडकॉन्स्टेबल चारुशिला गवई यांनी केली असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय करुटले करीत आहेत. अपघाताची नेमकी कारणे व अन्य बाबींचा तपास पोलीस करत आहेत. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment