---Advertisement---

Shegaon Crime: शेगावात जुन्या वादातून मजुरावर चाकूने हल्ला; मोबाईल फोडून जीवे मारण्याची धमकी!!

---Advertisement---

शेगाव | (डी ललित) : शेगाव शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात जुन्या वादातून एका 45 वर्षीय मजुरावर छोट्या चाकूने हल्ला केल्याची घटना 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी अंदाजे सायंकाळी 5 वा. घडली. या प्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी अक्षय ओंकार खंडारे (रा. खलवाडी परिसर, शेगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कैलाश मोतीराम भालेराव (वय 45, व्यवसाय मजुरी, रा. खलवाडी परिसर, शेगाव) हे जुन्या बसस्थानक परिसरातील पाण्याच्या टाकीजवळील सार्वजनिक शौचालयाजवळ असताना आरोपीने दारूच्या नशेत जुन्या वादाच्या कारणावरून त्यांना शिवीगाळ केली.

यानंतर आरोपीने फिर्यादीच्या छातीवर छोट्या चाकूने वार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. एवढेच नव्हे तर फिर्यादीचा Redmi कंपनीचा मोबाईल फोडून अंदाजे 700 रुपयांचे नुकसान केल्याचेही पोलिस तक्रारीत म्हटले आहे.

या घटनेनंतर कैलाश भालेराव यांच्या तक्रारीवरून शेगाव शहर पोलीस ठाण्यात अन्वये BNS कलम 118(1), 352, 351(2), 324(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल करण्याची कारवाई मपोहेका अर्चना उमाळे यांनी केली असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल श्याम आघाव करीत आहेत. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment