शेगाव, (डी ललित) : दि. 29 जुलै – शेगाव शहर पोलिसांनी धारदार शस्त्र बाळगून गंभीर गुन्ह्याच्या तयारीत असल्याच्या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 109(1), 118(1), 351(2) तसेच शस्त्र अधिनियम कलम 3 व 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पवन उर्फ बळीराम गजानन लांजुळकर (वय 26) व शिवाजी दिनकर तांदळे (वय 25) अशी असून, दोघेही रा. आळसणा, ता. शेगाव, जि. बुलढाणा येथील रहिवासी आहेत.
पोलिसांनी दोन्ही आरोपींना दि. 27 जुलै 2026 रोजी सायंकाळी 7:32 वाजता अटक केली. संबंधित गुन्हा दि. 26 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6:00 वाजता घडल्याचा आरोप असून, त्याची नोंद रात्री 10:52 वाजता करण्यात आली.
अटकेची माहिती आरोपींच्या नातेवाईकांना कलम 48 BNSS नुसार देण्यात आली असून, आरोपींना कलम 47 BNSS अंतर्गत आवश्यक नोटीसही बजावण्यात आली आहे. सध्या दोन्ही आरोपी शेगाव शहर पोलीस ठाण्याच्या हवालात असून पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईत सपोनि पवार यांनी प्रमुख भूमिका बजावली. (युवा क्रांती वृत्तसेवा)









