---Advertisement---

शेगावमध्ये देशी दारू जप्त; पोलिसांची कारवाई!!

---Advertisement---

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा): शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध दारू विक्रीवर पोलिसांनी कारवाई करत एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5.00 ते 5.45 वाजण्याच्या सुमारास गाडगे बाबा चौक परिसरात करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त बातमीच्या आधारे पंचांच्या उपस्थितीत छापा टाकण्यात आला. यावेळी आरोपी हर्षल साहेबराव शेगोकार (वय 32, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, शेगाव) याच्या ताब्यातून देशी दारूच्या टॅंगो पंच कंपनीच्या 90 मिलीच्या 21 बाटल्या जप्त करण्यात आल्या. या मुद्देमालाची एकूण किंमत 840 रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

या प्रकरणी शेगाव शहर पोलीस स्टेशन येथे कायम अपराध क्रमांक 250/2026 अंतर्गत मद्यनिषेध कायद्याच्या कलम 65 (इ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचे फिर्यादी जीपीएसआय गजानन पुरुषोत्तम गावंडे असून, दाखल अधिकारी पोहेकॉ विनायक सरोदे यांनी गुन्हा नोंदविला आहे.

सदर प्रकरणाचा पुढील तपास जीपीएसआय गजानन पुरुषोत्तम गावंडे हे करत आहेत.

पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा अवैध कृत्यांविषयी माहिती असल्यास तात्काळ पोलिसांना कळवावी.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment