शेगाव | (डी ललित) : शेगाव शहरातील शिवाजी चौक परिसरात दारूच्या नशेत दुचाकी चालवणाऱ्या एका ३० वर्षीय चालकाविरुद्ध शेगाव शहर पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई १० ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजता करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या चालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलीस मोहीम राबवत होते. यावेळी शिवाजी चौकातून रेल्वे स्टेशनच्या दिशेने जाणारी MH 30 B 28426 क्रमांकाची दुचाकी पोलिसांना वेडीवाकडी तसेच अनियंत्रित पद्धतीने जाताना दिसली.
पोलिसांनी वाहन थांबवून चालकाची चौकशी केली असता त्याचे नाव आकाश ज्ञानदेव तायडे (वय ३०, रा. सवर्णा, ता. शेगाव) असल्याचे समोर आले. चालकाच्या तोंडातून दारूचा वास येत असल्याने पोलिसांनी वैद्यकीय तपासणी केली. शेगाव येथील सईबाई मोटे रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत करण्यात आलेल्या तपासणीत संबंधित चालकाने मद्यसेवन केल्याचा अभिप्राय देण्यात आल्याचे पोलिसांच्या अहवालात नमूद आहे.
या प्रकरणी पोलीस हवालदार योगेश चोपडे यांच्या फिर्यादीवरून शेगाव शहर पोलीस ठाण्यात कायमी अपराध क्रमांक 508/2026, मोटार वाहन कायदा 1988 मधील कलम 185 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास PSI रमेश भामोदकर करीत आहेत. (युवा क्रांती वृत्तसेवा)








