शेगाव | (डी ललित) शेगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात दारूच्या नशेत दुचाकी चालविणाऱ्या एका 30 वर्षीय व्यक्तीविरुद्ध शेगाव शहर पोलिसांनी कारवाई केली. ही घटना 7 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजता घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, किसन एकनाथ घाटे (वय 30, रा. टाकळी धारव) हा छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून श्री गजानन महाराज मंदिराकडे दुचाकी क्रमांक MH-28-CA-0722 वरून जात होता. त्यावेळी तो वाहन अनियंत्रित वाकडे-तिकडे चालवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
दारूच्या नशेत वाहन चालवित असल्याचा संशय आल्याने त्याची शेगाव येथील रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याने दारूचे सेवन केल्याचा अभिप्राय दिल्यानंतर त्याच्याविरुद्ध मोटार वाहन कायदा 1988 मधील कलम 185 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्याद पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद मुळे यांनी दिली असून, तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश भामोदकर करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही मपोह चारुशिला गवई यांनी केली. (युवा क्रांती वृत्तसेवा)







