---Advertisement---

भक्तांच्या सोयीसाठी श्री गजानन महाराज मंदिर परिसरात मोबाईल वापरावर निर्बंध!!

---Advertisement---

शेगाव :(युवा क्रांती वृत्तसेवा): संत गजानन महाराज संस्थान यांच्या वतीने भक्तांच्या सोयीसाठी आणि मंदिर परिसरातील शांतता, शिस्त व अध्यात्मिक वातावरण अबाधित राखण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

यानुसार, श्री गजानन महाराज मंदिर परिसरात मोबाईल वापर बंद करण्याचा निर्णय संस्थान प्रशासनाने जाहीर केला आहे.

दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असताना मोबाईलमुळे होणारा गोंधळ, फोटो-व्हिडिओ शूटिंग आणि भक्तांच्या दर्शनातील अडथळे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

संस्थानच्या या निर्णयाचे अनेक भक्तांकडून स्वागत करण्यात येत असून, मंदिरातील अध्यात्मिक वातावरण अधिक शांत आणि भक्तिमय होण्यास मदत होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

गण गण गणात बोते!!
जय गजानन!!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment