---Advertisement---

Shegaon Crime: बेकायदेशीर देशी दारू विक्रीवर पोलिसांची धाड; 15 बाटल्या जप्त, एकावर गुन्हा!

---Advertisement---

शेगाव | (डी ललित) : शेगाव शहर पोलिसांनी बेकायदेशीर देशी दारू विक्रीविरोधात कारवाई करत रोकडिया नगर येथील एका तरुणाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत दि. 27 जुलै रोजी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत देशी दारूच्या 90 एमएलच्या 15 सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा क्रमांक 471/2026 अंतर्गत महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (e) नुसार कारवाई करण्यात आली. या प्रकरणातील फिर्यादी पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष शंकर गवई (वय 48) असून ते शेगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.

या प्रकरणातील आरोपी गणेश गोपाल शेळके (वय 27, रा. रोकडिया नगर, शेगाव, ता. शेगाव, जि. बुलढाणा) याच्यावर कारवाई करण्यात आली. हॉटेल सासुरवाडीच्या मागील मोकळ्या जागेत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पंचांसमक्ष छापा टाकण्यात आला.

कारवाईदरम्यान आरोपीच्या ताब्यातून टॅगो पंच कंपनीच्या 90 एमएलच्या 15 सीलबंद प्लास्टिकच्या देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त मुद्देमालाची किंमत ₹600 इतकी असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या प्रकरणाचा गुन्हा मपोहेका चारुशिला गवई यांनी दाखल केला असून, पोहेका निलेश गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment