---Advertisement---

शेगांवमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; आरोपी ताब्यात!!

---Advertisement---

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगांव शहरातील अकोट रोड परिसरात सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांनी छापा टाकून एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी दुपारी 1.05 ते 1.30 वाजण्याच्या दरम्यान गुरुकृपा रसवंती समोर ही कारवाई करण्यात आली. या वेळी आरोपी सतीश बबन मिरगे (वय 43, रा. सुरभी कॉलनी, अकोट रोड, शेगांव) याला जुगार खेळताना पकडण्यात आले.

कारवाईदरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून नगदी 670 रुपये, वरली मटका अंक लिहिलेली चिठ्ठी व एक डॉट पेन असा एकूण 670 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी पोलीस हवालदार गजानन प्रल्हाद वाघमारे यांच्या फिर्यादीवरून कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याची नोंद मपोका अर्चना उमाळे यांनी केली असून पुढील तपास पोहेका वाकेकर करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment