---Advertisement---

Shegaon Accident: झाडावरून पडल्याने 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू; म्हाडा कॉलनी मधील दुर्दैवी घटना!!

---Advertisement---

शेगाव, (डी ललित) : दि. 29 जुलै – शेगाव शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात झाडावरून पडल्याने एका 70 वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम 194 अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोतीराम काशीराम नेमाडे (वय 70, रा. अचलपूर, जि. अमरावती) हे शेगावच्या म्हाडा कॉलनी परिसरात काम करत असताना दि. 29 जुलै 2026 रोजी सकाळी अंदाजे 11.30 वाजण्याच्या सुमारास झाडावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी साईबाई मोटे सामान्य रुग्णालय, शेगाव येथे आणण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या लेखी मेमोच्या आधारे शेगाव शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेंद्रसिंग चव्हाण करीत आहेत. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment