---Advertisement---

शेगाव येथे वृद्ध व्यक्ती हरवली; शोध सुरू!!

---Advertisement---

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहर पोलीस स्टेशन येथे कायमी मिसिंग क्रमांक 24/2026 अंतर्गत एका वृद्ध व्यक्ती हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, बळीराम नारायण तायडे (वय 73 वर्ष), रा. सैनिक कॉलनी, शेगाव हे दि. 17 एप्रिल 2026 रोजी दुपारी सुमारे 2:30 वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेले असून अद्याप परत आलेले नाहीत.

हरवलेली व्यक्ती मानसिकदृष्ट्या कमजोर असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांची उंची अंदाजे 5.7 फूट असून रंग निमगोरा, बांधा सडपातळ आहे. केस काळे-पांढरे असून अंगात गुलाबी रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची लोअर, तसेच पायात चप्पल होती.

या प्रकरणी सागर सुरेश तायडे (वय 28 वर्ष, व्यवसाय – पानटपरी) यांनी शेगाव शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. परिसरात शोध घेऊनही संबंधित व्यक्ती आढळून न आल्याने पोलीसांनी मिसिंगची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. सदर प्रकरणाचा तपास पोहेका संजय करुटले हे करत असून दाखला अधिकारी म्हणून पोहेका सुनील सुसर यांनी नोंद केली आहे.

सदर व्यक्ती कुणास आढळल्यास तात्काळ खालील क्रमांकावर संपर्क साधावा:
मो. नं. 7499006721 / 8308087042 / 9011555539
किंवा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये माहिती द्यावी.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment