---Advertisement---

Shegaon News : शेगाव बसस्थानकातून ३० वर्षीय इसम बेपत्ता; पोलिसांत मिसिंग दाखल!!

---Advertisement---

शेगाव | (डी ललित) : शेगाव शहरातील बसस्थानक परिसरातून नाशिकला जात असल्याचे सांगून निघून गेलेला ३० वर्षीय इसम बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शेगाव शहर पोलिस ठाण्यात मिसिंग क्रमांक ५६/२०२६ नुसार नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदेश विलास इखारे (वय ३०, रा. शिरसगाव निळे, ता. शेगाव, जि. बुलडाणा) हे दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १.३० वाजताच्या दरम्यान शेगाव बसस्थानक येथून नाशिकला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले. मात्र, त्यानंतर ते घरी परतले नाहीत.

कुटुंबीयांनी नातेवाईक तसेच मित्रांकडे शोध घेतला; मात्र संदेश इखारे यांचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर त्यांच्या पत्नी पंचशीला संदेश इखारे यांनी शेगाव शहर पोलिस ठाण्यात तोंडी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी मिसिंगची नोंद केली.

बेपत्ता व्यक्तीचे वर्णन

संदेश विलास इखारे यांची उंची अंदाजे ५ फूट ५ इंच असून रंग सावळा व बांधा मध्यम आहे. त्यांनी निळ्या रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची पॅन्ट आणि काळी-हिरवी चप्पल परिधान केली आहे. त्यांचे केस काळे असून उजव्या हातावर ‘पंचशीला’ असे गोंदलेले आहे. त्यांच्याकडे लावा कंपनीचा मोबाईल आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल श्याम आघाव, यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मिसिंगची नोंद म.पो.हे.कॉ. गवई, यांनी केली आहे.

संदेश इखारे यांच्याबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास शेगाव शहर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment