शेगाव : प्रयोगशाळा परिचर या पदावर तब्बल ३७ वर्षे प्रदीर्घ व प्रामाणिक सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले संतोष जानकर यांचा ७ सप्टेंबर रोजी युवा क्रांती संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजप शहराध्यक्ष बाळूभाऊ घोरडे तसेच ‘वॉइस ऑफ मीडिया’चे तालुकाध्यक्ष नानाराव पाटील यांच्या हस्ते संतोष जानकर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रदीर्घ काळ प्रामाणिकपणे सेवा बजावून सेवानिवृत्त झाल्याबद्दल मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
संतोष जानकर यांनी आपल्या ३७ वर्षांच्या सेवाकाळात प्रयोगशाळा परिचर म्हणून विविध जबाबदाऱ्या पार पाडत संस्थेच्या दैनंदिन कामकाजात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या प्रदीर्घ, प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ सेवेला उपस्थितांनी यावेळी विशेष दाद दिली.
या सत्कार सोहळ्यास युवा क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय यादव, मिलिंद सोंडकर, अमोल चव्हाण, रवि कचरे, सचिन गायकवाड, निलेश फरटाडे, अमोल सोलणकर, मो. सालिक, ओम राखोंडे आदी उपस्थित होते.
३७ वर्षांची सेवा पूर्ण करून नव्या पर्वात प्रवेश करणाऱ्या संतोष जानकर यांचा हा सत्कार त्यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव ठरला.
पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा👇🏻








