शेगाव, (युवा क्रांती वृत्तसेवा) : दि. ७ जून २०२६ – श्री परमहंस परशराम महाराज सेवाधारी परिवार, जळतापूर/पिंपळोद यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला श्री परमहंस परशराम महाराज यांच्या महिमा ग्रंथांचा भव्य सामूहिक पारायण सोहळा रविवार, दि. ७ जून रोजी श्रीक्षेत्र शेगाव येथे अत्यंत भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
श्री माहेश्वरी भवन, एसटी स्टँडसमोर, शेगाव येथे सकाळी ८.३० वाजता पारायणास प्रारंभ झाला. विविध जिल्ह्यांतून आलेल्या शेकडो भाविकांनी या ऐतिहासिक व धार्मिक सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून श्री परमहंस परशराम महाराजांच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण केली. सामूहिक पारायणादरम्यान संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला होता.
पारायणानंतर भाविकांनी महाराजांच्या महिमा ग्रंथातील उपदेश व विचारांचे चिंतन केले. त्यानंतर सर्व उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या प्रसंगी भाविकांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण पाहावयास मिळाले.
या यशस्वी आयोजनासाठी जयंत सुरेशराव वानखडे (खामगाव/अमरावती), गोकुळभाऊ शेगोकर (आकोट), शंकरराव खवले (लोखोंडा), शरदराव देवरणकर (अध्यक्ष, शैव गुरव हितकारणी मंडळ, अमरावती), जयंत पुसदकर (अध्यक्ष, निळकंठेश्वर संस्था, अमरावती), भालचंद्रराव कथलकर (अंतरगाव गुरव), राजूभाऊ कथलकर, अशोकराव भारसाकळे, प्रशांतभाऊ देशमुख, परशरामभाऊ डोरस, पुरुषोत्तमराव खंडार, सुरेशराव रोहनकर, कैलासराव डांगे, शुभमराव पुसतकर, मभाऊ मोरे, मोहनराव पंडीत, दिपकराव राजनकर, संतोषराव दुत्तोंडे, अशोक आगरकर, चंद्रकांतराव पुसदकर, दत्ताभाऊ कापसे, सचिनराव चौधरी, गणेशराव भांडे, सचिनराव आरोकर, संदीप राजूरकर, हरिहरराव तांबस्कर, प्रभाकर शेगोकर, महेंद्रपाटील कथलकर, रामशंकर जयस्वाल, दिलीपभाऊ बेलबागकर, गोपालभाऊ चिखलकर, मनोजराव तायडे, राजूभाऊ पुसतकर, दत्ताभाऊ शिंदे, अनिल निहाटकर, नारायणराव डांडगे, अजय राव वाघमारे, जयेंद्रपाटील, बंडूपंत मोरे, सतीशराव पांडे व इतर सर्व संस्थांवरील सेवेकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व सेवाधारी, दानशूर भक्तगण, समाज बांधव आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग नोंदविणाऱ्या सर्वांचे आयोजक जयंत सुरेशराव वानखडे, अमरावती यांनी आभार मानले. महाराजांच्या कार्याच्या प्रचार-प्रसारामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या पत्रकार बंधूंचेही विशेष आभार व्यक्त करण्यात आले.









