---Advertisement---

रात्री पेट्रोल न मिळाल्यास नागरिकांचे हाल; आपत्कालीन परिस्थितीत मोठा प्रश्न!!

---Advertisement---

शेगाव(युवा क्रांती वृत्तसेवा) : शहरातील काही पेट्रोल पंपांवर रात्रीच्या वेळेस पेट्रोल देण्यास टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून समोर येत आहेत. अनेकदा पंप कार्यरत असतानाही “पेट्रोल पंप बंद आहे” असे सांगून वाहनधारकांना परत पाठविले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

विशेषतः एखादी गर्भवती महिला, गंभीर रुग्ण किंवा आपत्कालीन परिस्थितीत असलेल्या व्यक्तीस रात्री पेट्रोलची गरज भासल्यास मोठी अडचण निर्माण होत आहे. वेळेत पेट्रोल न मिळाल्यास रुग्णालयात पोहोचण्यास विलंब होऊ शकतो, ज्यामुळे जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नागरिकांनी सांगितले की, शहरात काही पेट्रोल पंप 24 तास सेवा असल्याचे दर्शवितात; मात्र प्रत्यक्षात रात्री पेट्रोल देण्यास नकार दिला जातो. त्यामुळे प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन रात्रीच्या वेळेस पेट्रोल पंप सेवा सुरळीत सुरू राहतील याची खात्री करावी, अशी मागणी होत आहे.

तसेच आपत्कालीन परिस्थितीत पेट्रोल नाकारणाऱ्या संबंधितांवर कारवाई करावी आणि नागरिकांसाठी हेल्पलाइन व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी नागरिकांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment