---Advertisement---

Shegaonमध्ये PhonePe द्वारे 99,899 रुपयांची सायबर फसवणूक; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल!!

---Advertisement---

शेगाव (डी ललित): शेगाव शहरातील झुडिओ मॉलमध्ये खरेदीसाठी गेलेल्या व्यक्तीच्या बँक खात्यातून PhonePe द्वारे 99 हजार 899 रुपये अनोळखी खात्यात वर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनोज गंगाधर खुंटे (वय 47) हे 16 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी पत्नीसमवेत शेगाव येथील झुडिओ मॉलमध्ये खरेदीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांचा Oppo कंपनीचा मोबाईल अचानक गरम होऊन बंद पडला. सुमारे दहा मिनिटांनंतर मोबाईल पुन्हा सुरू झाल्यानंतर त्यांनी खरेदी केलेल्या कपड्यांचे ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी PhonePe उघडले.

दरम्यान, सायंकाळी 5.14 वाजता त्यांच्या SBI बँक खात्यातून PhonePe द्वारे 99,899 रुपये अनोळखी खात्यात ट्रान्सफर झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आपण कोणतेही व्यवहार केले नसतानाही रक्कम वर्ग झाल्याने मोबाईल हॅक करून बँक खात्यातून पैसे काढून आर्थिक फसवणूक केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.

या प्रकरणी 25 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 4.54 वाजता शेगाव शहर पोलीस ठाण्यात कलम 318(4) BNS तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम 66(C), 66(D) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निमीष मेहेत्रे करीत आहेत. नागरिकांनी मोबाईलवर संशयास्पद व्यवहार आढळल्यास तातडीने बँक व संबंधित सायबर यंत्रणेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment