---Advertisement---

Shegaon : शेगावात घराचे कुलूप तोडून ४९ हजारांचा मुद्देमाल चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल!!

---Advertisement---

शेगाव |(डी ललित): शहरातील जुना चिंचोली रोड परिसरातील वृद्धावन नगर येथे घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शेगाव शहर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्धावन नगर, जुना चिंचोली रोड येथील प्रभाकर जगन्नाथ धुमाळे यांच्या घरात ही चोरी झाली. दि. १७ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेपासून ते दि. २० सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजण्यापूर्वीच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाला लावलेले कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

चोरट्याने घरातील लोखंडी आलमारीत ठेवलेले अंदाजे ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले एक जोड आणि अंदाजे ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पॅन्डल, असे एकूण ६ ग्रॅम सोन्याचे दागिने, ज्यांची किंमत सुमारे २४ हजार रुपये आहे, तसेच २५ हजार रुपये रोख असा एकूण ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

घटना लक्षात आल्यानंतर प्रभाकर धुमाळे यांनी शेगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून कायम अप.नं. ५९४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम ३३१(३), ३३१(४) व ३०५ अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष गवई करीत असून, चोरीला गेलेले दागिने व आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment