---Advertisement---

Shegaon : शेगाव रेल्वे स्थानकावर स्वच्छता पखवाड्याच्या दुसऱ्या दिवशी रुळांची स्वच्छता!!

---Advertisement---

शेगाव |(डी ललीत) : स्वच्छता पखवाड्यांतर्गत शेगाव रेल्वे स्थानकावर दुसऱ्या दिवशी फलाट क्रमांक १ लगतच्या रुळांवर प्रवाशांकडून फेकण्यात आलेला कचरा गोळा करून स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत शेगाव येथील रोटरी क्लबच्या सदस्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला.

यावेळी स्थानक प्रबंधक मोहन देशपांडे आणि स्वास्थ्य निरीक्षक रुची शर्मा यांच्या उपस्थितीत रेल्वे स्थानक परिसरातील रुळांची स्वच्छता करण्यात आली. स्थानकावरील हाऊसकिपिंग स्टाफने स्वच्छता मोहिमेदरम्यान ‘प्लास्टिक हटाव, देश बचाव’, ‘आगे ही सेवा है’ तसेच ‘गांधीजीने दिया संदेश, स्वच्छ रहे भारत देश’ अशा घोषणांच्या माध्यमातून प्रवाशांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती केली.

या मोहिमेत रोटरी क्लबतर्फे रोटरियन आशिष दिवांका, रोटरियन निखिल कियाल यांच्यासह रोटरी क्लबचे सदस्य, तिकीट निरीक्षक सुमित देशमुख, भिका बनकर आणि सफाई पर्यवेक्षक राम उबाळे उपस्थित होते. रेल्वे स्थानक परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रवाशांनी कचरा रुळांवर अथवा परिसरात न टाकता उपलब्ध कचरापेटीचा वापर करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment