---Advertisement---

Road First, Pipeline Later? ज्ञानेश्वरी नगरात Shegaon Nagar Parishad चा Planning Fail!

---Advertisement---

शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : 25 जुलै -शेगाव नगर परिषदेच्या नियोजनशून्य कारभाराचा आणखी एक नमुना ज्ञानेश्वरी नगर, अकोट रोड परिसरात समोर आला आहे. लाखो रुपये खर्च करून नव्याने उभारण्यात आलेला काँक्रीट रस्ता काही दिवसांतच पाणीपुरवठ्यासाठी नळजोडणीच्या कामामुळे पुन्हा खोदण्यात आला आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, नगर परिषदेच्या नियोजन आणि विभागीय समन्वयावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याचे काम सुरू असताना किंवा पूर्ण होण्यापूर्वी पाणीपुरवठा विभाग आणि बांधकाम विभाग यांच्यात आवश्यक समन्वय साधला गेला नाही. परिणामी, नव्याने तयार झालेला काँक्रीट रस्ता जेसीबीच्या सहाय्याने पुन्हा खोदावा लागला. त्यामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

नागरिकांचे म्हणणे आहे की, आधी नळजोडणी, ड्रेनेज आणि इतर भूमिगत कामे पूर्ण करून त्यानंतर रस्त्याचे बांधकाम करणे अपेक्षित होते. मात्र, नगर परिषद प्रशासनाने उलट क्रमाने कामे केल्याने सार्वजनिक निधीचा अपव्यय झाला असून नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

रस्ता खोदल्यामुळे परिसरात धूळ, चिखल आणि वाहतुकीची गैरसोय निर्माण झाली आहे. पावसाळ्यात या ठिकाणी अपघाताचा धोका वाढला असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांसाठी हा रस्ता धोकादायक ठरत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

ज्ञानेश्वरी नगरातील रहिवाशांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. भविष्यात विकासकामे करताना सर्व संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून नियोजनबद्ध पद्धतीने कामे करण्यात यावीत, अशीही त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.

दरम्यान, “आधी रस्ता बांधा आणि नंतर तोच पुन्हा खोदा” अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शेगाव नगर परिषदेच्या कामकाजावर नागरिकांकडून तीव्र टीका होत असून, या प्रकरणावर प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा👇🏻

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment