---Advertisement---

शेगावात ४ ऑक्टोबरला संत निरंकारी मिशनचा भव्य रक्तदान महोत्सव!

---Advertisement---

शेगाव I (युवा क्रांती वृत्तसेवा) : मानवतेची सेवा या उद्देशाने संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने गेल्या चार दशकांपासून देशभर रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात आहे. याच सेवाभावी उपक्रमाचा भाग म्हणून संत निरंकारी मिशनच्या वतीने शेगाव येथील संत निरंकारी सत्संग भवन येथे रविवारी, ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत भव्य रक्तदान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

तत्कालीन सद्गुरु बाबा हरदेवसिंह जी महाराज यांच्या “रक्त नालियों में नहीं, नाड़ियों में बहना चाहिए” या संदेशाला प्रत्यक्ष कृतीत उतरवत संत निरंकारी मिशनचे अनुयायी देशभर रक्तदानाची अखंड शृंखला राबवत आहेत. या अभियानांतर्गत आतापर्यंत १४ लाख ५० हजार युनिटपेक्षा अधिक रक्तदान करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.

वर्तमान सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने शेगावात आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान महोत्सवाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. रक्तदानाबाबत जनजागृती करण्यासाठी शनिवार, ३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत शेगाव शहरातून भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

या मानवतावादी उपक्रमात शेगाव शहरातील तरुण-तरुणी, पुरुष तसेच महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावे, असे आवाहन संत निरंकारी मिशन, शेगावचे जिल्हा संयोजक संतोष शेगोकार यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment