शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) – शेताचा रस्ता मोकळा करण्यासाठी सुरू असलेल्या शासकीय कामात अडथळा आणत तलाठीला लोटपाट करून धमक्या दिल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 28 एप्रिल रोजी पाळोदी शेतशिवारात घडली.
फिर्यादी संतोष गोविंद कानडे (वय 50) हे निवासी तहसीलदार पदावर कार्यरत असून, अर्जदाराच्या शेताचा रस्ता मोकळा करण्यासाठी शासकीय कर्मचारी व पोलीस पथकासह घटनास्थळी उपस्थित होते.
यावेळी आरोपी विनोद अर्जुन फुलकर व सौ. रिता विनोद फुलकर (दोघे रा. पाळोदी, ता. शेगाव) यांनी तलाठीला लोटपाट करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तसेच जेसीबी वाहनासमोर येऊन शिवीगाळ करत “तुम्ही रस्ता कसा मोकळा करता” असे म्हणत धमक्या दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.या प्रकरणी अंतर्गत खालील कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 132, 223(a), 115, 352, 351(2), 351(3) BNS
या प्रकरणी दाखल अधिकारी: HC श्रीराम चौधरी यांनी गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास अधिकारी: ASI धनराज माने यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.







