---Advertisement---

Shegaon News : शेगावात तंबाखूजन्य पदार्थांवर पोलिसांची कारवाई; ₹620 किमतीचा मुद्देमाल जप्त!!

---Advertisement---

शेगाव | (डी ललित) : शेगाव शहरातील हरलालका स्कूलजवळ पोलिसांनी कारवाई करत विविध प्रकारचे तंबाखूजन्य पदार्थ व सिगारेट असा एकूण ₹620 किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध सिगारेट व तंबाखू उत्पादने अधिनियम 2003 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस नोंदीनुसार, 7 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5 ते 5.30 वाजताच्या सुमारास शेगाव शहर पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार हरलालका स्कूल शेजारी छापा टाकला असता शेख मोहंमद शेख जाकीर शेख (वय 50, रा. आझाद नगर, शेगाव) यांच्या ताब्यात विविध तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले.

कारवाईदरम्यान नितीन तंबाखूच्या 20 पुड्या, रवाल तंबाखूच्या 20 पुड्या, बुढ्ढा तंबाखूच्या 15 पुड्या आणि गोल्ड फ्लेक सिगारेटची 2 पाकिटे, तसेच प्लास्टिक पिशवी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ₹620 असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश वाटेकरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेगाव शहर पोलीस ठाण्यात सिगारेट व तंबाखू उत्पादने अधिनियम 2003 मधील कलम 6 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल वाघमारे करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोहेकॉ विनायक सरोदे यांनी केली. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment