---Advertisement---

Shegaon News: वेंकटेश नगरात २७ वर्षीय तरुणीचा गळफास घेऊन मृत्यू; पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद!!

---Advertisement---

शेगाव (डी ललित) : शहरातील वेंकटेश नगर परिसरात २७ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना ५ सप्टेंबर रोजी रात्री उघडकीस आली. या प्रकरणी शेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद कलम १९४ BNSS अन्वये करण्यात आली आहे.

पोलीस दैनंदिनीतील माहितीनुसार, मृत तरुणीचे नाव कीर्ती राजेश गोंड (वय २७, रा. वेंकटेश नगर, शेगाव) असे आहे. नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार तिला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर शेगाव येथील स.मो.सा. रुग्णालयाच्या अपघात विभागात दाखल करण्यात आले होते. मात्र, वैद्यकीय तपासणीत तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

रुग्णालयातील कक्षसेवक प्रकाश मोरे यांनी मेमो क्रमांक १८७६४ पोलिस ठाण्यात दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला.

पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार सुनील सुसर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मृत्यूची नेमकी परिस्थिती आणि कारणाबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment