बुलढाणा | (युवा क्रांती वृत्तसेवा) : 20 जुलै-क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ६५ वी जिल्हास्तरीय सुब्रतो कप फुटबॉल स्पर्धा १७ ते १९ जुलै २०२६ या कालावधीत सहकार विद्या मंदिर, चिखली रोड, बुलढाणा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील १५ शालेय संघांनी सहभाग घेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे, बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीच्या अध्यक्षा कोमलजी झंवर, तालुका क्रीडा अधिकारी प्रशांत मडले, सहकार विद्या मंदिराचे प्राचार्य सामी, जिल्हा फुटबॉल संघटनेचे सदस्य मुकेश बाफना, क्रीडा शिक्षक, पंच, खेळाडू आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेतील निकाल
१५ वर्षांखालील मुलांचा गट
- 🥇 प्रथम : शारदा ज्ञानपीठ, बुलढाणा
- 🥈 द्वितीय : सहकार विद्या मंदिर, बुलढाणा
- 🥉 तृतीय : उर्दू हायस्कूल, बुलढाणा
१७ वर्षांखालील मुलांचा गट
- 🥇 प्रथम : शारदा ज्ञानपीठ, बुलढाणा
- 🥈 द्वितीय : सहकार विद्या मंदिर, बुलढाणा
- 🥉 तृतीय : ए. पी. जे. अब्दुल कलाम स्कूल, धाड
१७ वर्षांखालील मुलींचा गट
- 🥇 प्रथम : सेंट जोसेफ स्कूल, बुलढाणा
- 🥈 द्वितीय : शारदा ज्ञानपीठ, बुलढाणा
स्पर्धेतील विजेते व उपविजेते संघांना चषक व पदके प्रदान करून गौरविण्यात आले. प्रत्येक सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही विशेष पारितोषिक देण्यात आले.
स्पर्धेचे पंच म्हणून रमीज चौधरी, राहुल ओशलकर, निसार सय्यद, जावेद खान, प्रेम सोनवणे, अर्जुन दांडगे, साई टाके आणि प्रतीक किलबिले यांनी जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्य क्रीडा मार्गदर्शक डॉ. जीवन मोहोड यांनी केले, तर मनोज श्रीवास यांनी आभार मानले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.










