---Advertisement---

Sangrampur News : संग्रामपूरमध्ये उमेद कर्मचारी कल्याणकारी संघटनेचे आंदोलन; प्रलंबित मागण्यांसाठी सरकारविरोधात एल्गार!!

---Advertisement---

संग्रामपूर,(आकाश बोरसे) : दि. २५ ऑगस्ट २०२६- गेल्या दोन ते तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या वतीने संग्रामपूर येथे आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री तसेच ग्रामविकास मंत्र्यांसोबत बैठका होऊनही मागण्यांबाबत दिलेली आश्वासने पूर्ण झाली नसल्याने हे आंदोलन करण्यात येत असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

उमेद अभियानाला शासकीय सेवेत समाविष्ट करण्याची मागणी

उमेद अभियानाला ग्रामविकास व पंचायत राज विभागाचा नियमित विभाग म्हणून मान्यता देण्यात यावी. तसेच अभियानातील कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदाच्या समकक्ष शासकीय पदावर कायमस्वरूपी सामावून घ्यावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.

CRP व सखींना शासकीय दर्जा द्या

Community Resource Person (CRP) अंतर्गत कार्यरत बँक सखी, कृषी सखी, पशु सखी, ग्रामसंघ लिपिका आदींना आशा सेविका व अंगणवाडी सेविकांप्रमाणे शासकीय दर्जा देण्यात यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.

450 कर्मचाऱ्यांचे करार नूतनीकरण करण्याची मागणी

सुमारे 450 कर्मचाऱ्यांचे करार संपले असून त्यांना कार्यमुक्त करण्याचे परिपत्रक काढण्यात आल्याचे संघटनेने सांगितले. हे परिपत्रक थांबवून संबंधित कर्मचाऱ्यांच्या कराराचे तातडीने नूतनीकरण करावे, अशी मागणी करण्यात आली.

मानधन वाढीसह सामाजिक सुरक्षेची मागणी

कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याबरोबरच PF, विमा आणि रजा सुविधा यांसारख्या सामाजिक सुरक्षा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. गेल्या अनेक वर्षांपासून उमेद अभियानातील महिला व कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित असल्याने शासनाने याची तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment