---Advertisement---

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सोनाळा वनपरिक्षेत्रात वृक्षारोपण व वृक्षवाटप कार्यक्रम उत्साहात!!

---Advertisement---

सोनाळा | (आकाश बोरसे) : दि.6 जून –“वृक्षावली आम्हा सोयरे वनचरे” हा संत तुकाराम महाराजांचा संदेश मानवाला निसर्गाशी घट्ट नाते जोडण्याची प्रेरणा देतो. मात्र वाढती जंगलतोड, प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असून पृथ्वीचे तापमान सातत्याने वाढत आहे. या गंभीर समस्येबाबत जनजागृती व्हावी व पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने वनपरिक्षेत्र कार्यालय सोनाळा यांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज इको सायन्स पार्क, वसाळी येथे आयोजित या कार्यक्रमात वृक्षारोपणासह नागरिकांना विविध प्रजातींच्या वृक्षांचे मोफत वाटप करण्यात आले. “एक झाड माँ के नाम” स्मृती उपक्रमांतर्गत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात वृक्षांचे महत्त्व विशद करत प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन केले. पर्यावरणाचे रक्षण ही काळाची गरज असून भावी पिढीसाठी हिरवेगार व प्रदूषणमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे मत व्यक्त करण्यात आले.

या कार्यक्रमाला वन समितीचे अध्यक्ष गोपाल कास्देकर, वन परीक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) सोनाळा अजय बावणे, वसाळी वर्तुळचे वनपाल सुधीर आंबेकर, गजानन सोळंके, देव बेराड, अनिल पारधी, पवन जग्रवाल, दारासिंग धाडशिंबे, हरीओम बेठेकर, मगेश डोंगळे, राणी गरुड, लीला जामूनकर, ममता बेटेकर यांच्यासह वसाळी ग्रामपंचायतीच्या सरपंच समजकोर बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच अंबाबरवा असोसिएशन युनियनचे अध्यक्ष खुमसिंग, अध्यक्ष रवी मांडलेवी, सचिव आरिफ केदार, सिकंदरसिंग बाबर, सुनील पालकर, मोतीलाल मोरे, सुकलाल डावर, सुमित पालकर, कृष्णा डावर, किशोरसिंग बाबर, नजीर पालकर, अशोक पालकर, किशोर सुरत्ने, अतुल पालकर तसेच अंबाबरवा अभयारण्यातील गाईड, जिप्सी चालक-मालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामस्थांना विविध प्रकारच्या वृक्षांचे मोफत वाटप करून त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले. या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment