---Advertisement---

सुप्रसिद्ध लेखक श्रीराम पुंडे यांचा भव्य सत्कार

---Advertisement---

श्री तानाजी व्यायाम मंडळाच्या उपक्रमामुळे इतिहास जागृतीचा वसा

खामगांव (युवा क्रांती वृतसेवा) : खामगाव शहरातील प्रतिष्ठित श्री तानाजी व्यायाम मंडळाने आयोजित केलेल्या भव्य सत्कार समारंभाने शहरात इतिहास जागृती आणि समाजहितासाठी कार्यरत असलेल्या उपक्रमांची चर्चा रंगली आहे. सुप्रसिद्ध लेखक, इतिहास अभ्यासक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक श्रीराम पुंडे यांचा या कार्यक्रमात गौरव करण्यात आला.

सत्कार सोहळ्याला व्यायाम मंडळाचे सचिव ओंकार आप्पा तोडकर, कोषाध्यक्ष सुनील आंबेकर तसेच माजी आमदार नानाभाऊ कोकरे, सामाजिक कार्यकर्ते अशोक देवकाते, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर डॉ. हटकर, मनोहर पाचपोर, प्रकाश जुमळे, ठोंबरे यांसह शहरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात इतिहासाची ओळख करून देणाऱ्या झलकांचे विशेष प्रदर्शन लावण्यात आले होते. पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर, तसेच इतर युगपुरुषांच्या कार्याचा परिचय करून देणारी छायाचित्रे आणि माहितीपट पाहून उपस्थितांनी व्यायाम मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमाला श्रीराम पुंडे यांच्या प्रेरणेचा आणि मार्गदर्शनाचा मोठा आधार मिळाला असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

सत्कार सोहळ्यात बोलताना मान्यवरांनी इतिहास अभ्यासक पुंडे यांच्या कार्याची आणि व्यायाम मंडळाने राबवलेल्या उपक्रमाची प्रशंसा केली. “आजच्या पिढीला आपल्या परंपरेची आणि इतिहासाची जाणीव व्हावी, राष्ट्रीय चेतना जागृत व्हावी यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे,” असे प्रतिपादन माजी आमदार नानाभाऊ कोकरे यांनी केले.

दरम्यान, या उपक्रमामुळे खामगाव शहरात इतिहासाच्या जाणिवेबाबत सकारात्मक चर्चा सुरू झाली असून नागरिकांनी मंडळाच्या कार्याचे मनःपूर्वक स्वागत केले आहे. पुढेही अशा उपक्रमांतून समाजप्रबोधन आणि राष्ट्रहितासाठी योगदान देण्याचा मंडळाचा संकल्प आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment