विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाची मागणी
संग्रामपूर (आकाश बोरसे):अकोला जिल्ह्यातील गुलजारपुरा येथे 13 वर्षांच्या अल्पवयीन हिंदू बालिकेवर तोहीत समीर या विकृताने अमानुष अत्याचार केल्याची घटना अत्यंत दुःखद आणि संतापजनक आहे. या घटनेचा संग्रामपूर तालुक्यात तीव्र निषेध करण्यात आला. आज सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय संग्रामपूर आणि पोलीस स्टेशन तामगांव येथे विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
या वेळी सकल हिंदू समाजासह विश्व हिंदू परिषद व बजरंग दल, संग्रामपूर प्रखंडाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने मागणी केली की आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा मिळावी आणि भविष्यात अशा विकृत घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस आणि प्रभावी कायदेशीर कारवाई करावी.
कार्यकर्त्यांनी प्रशासनाला इशारा दिला की अशा घटनांकडे दुर्लक्ष होऊ नये आणि समाज सुरक्षित राहावा यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी आवश्यक आहे. (युवा क्रांती वृतसेवा)
- Shegaon news:लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती व दैनिक ‘लोक युवा’चा वर्धापन दिन उत्साहात; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा ‘लोकनायक पुरस्कार’ देऊन गौरव!
- Shegaon Railway Police ची तत्परता! ₹12,999 किमतीचा Realme Mobile शोधून प्रवाशाच्या ताब्यात दिला!!
- Buldhana News: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर केंद्रीय राज्यमंत्री Prataprao Jadhav; नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश!!
- Fishing During Heavy Rains: मासे पकडताना पाय घसरून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; तब्बल 15 तासांनंतर मृतदेह बाहेर!!
- Shegaon Crime: पारीजात नगरातील बंद घर फोडून चोरी; सोन्याचे दागिने, रोकडसह ₹58 हजारांचा ऐवज लंपास!!









