---Advertisement---

7 तालुक्यांच्या शेतकरींना दिलासा! वाढीव पिकविमा नुकसानभरपाई प्रक्रिया सुरू

---Advertisement---

पोर्टलवर टप्प्याटप्प्याने रक्कम दिसणार; शेतकऱ्यांनी घाई न करता प्रक्रियेला वेळ द्यावा: प्रशासनाचे आवाहन

बुलडाणा (युवा क्रांती वृत्तसेवा) : मलकापूर, नांदुरा, संग्रामपूर, जळगाव जामोद यांसह जिल्ह्यातील सात तालुक्यांसाठी वाढीव पिकविमा नुकसानभरपाईची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. यानुसार सरकारने मंजुरी देत वरिष्ठ पातळीवरील समितीची बैठकही पूर्ण केली असून आता नुकसानभरपाईचे पोर्टलवर भरणे सुरू झाले आहे.

संबंधित तालुक्यांतील प्रलंबित नुकसानभरपाई वितरणासाठी शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने WSL अंतर्गत तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणीपश्चात नुकसानभरपाई या विभागांमध्ये पात्र शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर चढविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सध्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत मंजूर झालेली नुकसानभरपाई पोर्टलवर दिसू लागली आहे. ज्या शेतकऱ्यांनी काढणीपश्चात नुकसान या श्रेणीत तक्रार नोंदवली होती, त्यांचे डेटा अपलोड होण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच त्या शेतकऱ्यांनाही त्यांच्या पात्र नुकसानभरपाईची रक्कम पोर्टलवर दिसणार आहे.

प्रशासनानुसार ही संपूर्ण प्रक्रिया अद्याप सुरू असून पूर्ण होण्यासाठी काही वेळ लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अनावश्यक घाई न करता प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संयम ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच नुकसानभरपाई पोर्टलवर दिसत नसल्यास किंवा कोणतीही अडचण असल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभाग किंवा तालुका पिकविमा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

शासनाच्या मंजुरीनंतर वाढीव नुकसानभरपाई प्रक्रियेला गती मिळाल्याने सातही तालुक्यांतील शेतकऱ्यांना लवकरच आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment