शेगाव (डी ललित) : शहरातील बाळापूर रोडवरील मारवाडी समाजाच्या स्मशानभूमीतून अज्ञात चोरट्याने रिअर ऑटो, बांधकामासाठी वापरण्यात येणारे 14 तराफे आणि ग्राइंडर मशीन असा एकूण ₹45 हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख मोहम्मद शेख रौफ शेख (वय 38, रा. इदगा प्लॉट, शेगाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अन्वये दाखल करण्यात आला आहे.
ही चोरी 31 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6.00 ते 1 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9.00 या कालावधीत घडली. चोरट्यांनी MH30 F314 क्रमांकाचा रिअर ऑटो (अंदाजे किंमत ₹30,000), 14 तराफे (₹14,000) आणि एक ग्राइंडर मशीन (₹1,000) असा एकूण ₹45,000 किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बारिगे करीत आहेत.
चोरीस गेलेला मुद्देमाल
- रिअर ऑटो (MH30 F314) – ₹30,000
- 14 तराफे – ₹14,000
- ग्राइंडर मशीन – ₹1,000
- एकूण नुकसान : ₹45,000 (युवा क्रांती वृत्तसेवा)








