संग्रामपूर (आकाश बोरसे) : संग्रामपूर तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांच्या हक्काचे घरकुल धनादेश मिळाले नसल्याने लाभार्थी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या गंभीर समस्येच्या पार्श्वभूमीवर संग्रामपूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने पंचायत समितीला निवेदन देण्यात आले.
घरकुल लाभार्थ्यांची घरे अर्धवट अवस्थेत असून बांधकाम साहित्य दुकानदारांची उधारी वाढली आहे. तसेच मजुरांची मजुरी थकित राहिल्याने लाभार्थ्यांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागत आहे. ही परिस्थिती तात्काळ दूर करावी, अशी ठाम मागणी काँग्रेस कमिटीने निवेदनाद्वारे केली आहे.
धनादेश न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा
निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, तालुक्यातील सर्व घरकुल लाभार्थ्यांचे धनादेश तात्काळ वितरीत न केल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येईल.
निवेदन देताना उपस्थित पदाधिकारी
यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे —
- सतीश टाकळकार – संग्रामपूर तालुका अध्यक्ष
- अशोक भिवटे – तालुका उपाध्यक्ष
- राजिक शेख – संग्रामपूर शहराध्यक्ष
- तेजराव मारोडे – ज्येष्ठ नेते
- प्रकाश साबे
- अभयसिंह मारोडे
- राहुल साबे
- योगेश बाजोड
हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
काँग्रेस कमिटीने प्रशासनाने घरकुल लाभार्थ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. (युवा क्रांती न्यूज)











