---Advertisement---

“भोंदू खरात प्रकरणावर राजकारण नको”— मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा परखड इशारा!!

---Advertisement---

मुंबई | (युवा क्रांती वृत्तसेवा): भोंदू अशोक खरात प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडत या प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये, असे ठाम मत व्यक्त केले आहे.

फडणवीस म्हणाले की, “ज्या मविआ सरकार च्या काळात खरातच्या संस्थेला नियम डावलून पाणीपुरवठा करण्यात आला, त्यांनी आता या प्रकरणावर राजकारण करणं योग्य नाही.” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर जोरदार टोलाही लगावला.

⚖️ रूपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावरही स्पष्ट भूमिका

मुख्यमंत्र्यांनी रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याबाबतही स्पष्टीकरण दिलं.

त्यांच्या मते, चाकणकर या खरातला गुरूस्थानी मानत होत्या, त्यामुळेच खरातच्या अटकेनंतर त्या पदावर राहणं योग्य नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आणि स्वतःहून राजीनामा दिला.

🧩 प्रकरणाचा राजकीय ताप वाढणार?

या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
एकीकडे सत्ताधारी पक्षाने विरोधकांवर आरोपांची सरबत्ती केली आहे, तर दुसरीकडे विरोधकांकडूनही प्रत्युत्तराची शक्यता वर्तवली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment